प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनातालुका भूषण पुरस्कार
चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा किसान आर्मी, वॉटर आर्मी या संस्थेच्यावतीने सांगोला तालुका भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
संस्थेने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या संस्था, व्यक्ती व अधिकार्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. लिगाडे हे गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. येथील प्रांताधिकारी म्हणून कार्यभार घेवून त्यांना काही महिनेच झाले आहेत. यावर्षी शहरात आलेल्या पुराच्या पाण्यावेळी त्यांनी घेतलेली खबरदारी अनेकांच्या कौतुकास पात्र ठरली. www.konkantoday.com