शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सह्याद्रीत गौरव
मानाचा आणि अभिमानाचा समजल्या जाणार्या महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्तम श्री शिवछत्रपती पुरस्कारावर कादवड येथील एकाच शिंदे कुटुंबातील तिघांनी मोहोर उमटवली. अशा पद्धतीने पुरस्कार मिळवारे राज्यातील हे एकमेव कुटुंब आहे. त्यामुळे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते या कुटुंबियांचा सह्याद्री शिक्षण संस्थेत यथोचित सन्मान करण्यात आला.
कादवड येथील याशिका शिंदेने नुकताच महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती पुरस्कार मिळवला. याशिकासह तिचे वडिल विश्वजित शिंदे आणि आत्या नंदा शिंदे-देसाई या दोघांनीही श्री छत्रपती पुरस्कार यापूर्वी मिळवला होता. एकाच कुटुंबातील तिघांनी पुरस्कार मिळवण्याचे भाग्य राज्यातील कादवड येथील शिंदे कुटुंबियांना मिळाला आहे. आमदार निकम यांनी या तिघांसह अडरे येथील एस.जी. एस. या जागतिक कंपनीमध्ये डायरेक्टर असणारे संतोष कदम यांचाही सत्कार केला.
यावेळी संस्थेचे सचिव महेश महाडीक, विधानसभा अध्यक्ष रमेश राणे, स्वप्नील शिंदे, दिनेश कदम, तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमोंडकर, सरपंच शेखर उकार्डे, युवक अध्यक्ष निलेश कदम, सिकंदर चिपळूणकर, सचिन साडविलकर, शामकांत कदम, जयवंत अदावडे, बाबा राजेशिर्के, संतोष कदम, विश्वजित शिंदे, संजय कदम, राजा कदम उपस्थित होते.
www.konkantoday.com