खरीप हंगाम 2023 साठी ई पीक पहाणी नोंदणी पूर्ण करावी- सुनंदा कुऱ्हाडे

0
47

*रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींनी व गणेश उत्सवाकरिता आलेल्या सर्व गणेश भक्तांना शासनाच्या विविध योजनांचा जसे की प्रधानमंत्री पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मिळणारे लाभ घेताना अडचणी टाळण्यासाठी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले आहे.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या
मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या अॅपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.
खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घ्यावे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here