वंदे भारत’ ही दीर्घ पल्ल्याची स्लिपर कोच गाडी मार्च 2024 मध्ये रुळावर येणार
देशातील धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळे आणि आर्थिक राजधान्यांना जोडणारा ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने मार्गक्रमण करू लागल्यानंतर आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होतो आहे.वंदे भारत’ एक्स्प्रेसबरोबर भारतीय रेल्वेच्या ताफ्यात ‘वंदे भारत स्लिपर कोच’ आणि ‘वंदे भारत मेट्रो’ या दोन प्रकल्पांच्या कामाने गती घेतली आहे. यातील ‘वंदे भारत’ ही दीर्घ पल्ल्याची स्लिपर कोच गाडी मार्च 2024 मध्ये म्हणजेच ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत रूळावर दाखल होईल, असे नियोजन केले आहे.
‘वंदे भारत’ ही अस्सल भारतीय बनावटीची रेल्वे आहे. या गाडीच्या डब्यांचे काम इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीटी) येथे केले जाते. या संस्थेचे सरव्यवस्थापक बी. जी. मल्ल्या यांनी याला दुजोरा दिला आहे.
www.konkantoday.com