दापोली आगारातील महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेचे पदाधिकारी उपोषणाला बसणार

0
46

एसटीच्या दापोली आगारातील कर्मचाऱ्यांच्या अडचणींसंदर्भात रत्नागिरी विभाग नियंत्रक कार्यालयाशी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल न घेतल्याने व २० सप्टेंबरपर्यंत या मागण्याची दखल न घेतल्यास २४ सप्टेंबरपासून उपोषणाला बसण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेचे सह प्रादेशिक सचिव प्रणव रेळेकर यांनी दिला आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या दापोली आगारातील महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेच्या पदाधिकारी यांनी ८ ऑगस्टला दापोली आगारातील कर्मचाऱ्यांना अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी विभाग नियंत्रकांकडे केली होती. त्यानुसार एक महिन्याने म्हणजे ७ सप्टेंबरला आमच्या मागण्या संदर्भात विभाग नियंत्रक यांनी आगार कार्यकारिणीकडे पत्रव्यवहार केला होता. संघटनेने विभाग नियंत्रक यांना ७ सप्टेंबरला दिलेल्या पत्राला विभाग नियंत्रकांनी उत्तर न दिल्याने २४ सप्टेंबरपासून उपोषणाला दापोली आगारासमोर बसणार असल्याचे पत्र आगारप्रमुखांना दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या उपोषणामुळे एसटी प्रवाशांची होणारी गैरसोय आणि एसटीच्या नुकसानीला सर्वस्वी आपण जबाबदार असाल, असा इशारा रत्नागिरी येथील विभाग नियंत्रक यांना दिला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here