मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, चाकरमान्यांचा रखडत प्रवास, पहा व्हिडिओ
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेक तास चाकरमान्यांना प्रवासासाठी लागत आहेत गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणाकडे निघाल्याने मुंबई गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या मार्गावर 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात निघालेले असताना माणगावजवळ बाजारपेठ परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती बाजारपेठ परिसरातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माणगाव बस स्थानकात पुणे आणि श्रीवर्धन जोड रस्ता त्याच बरोबर बाजारपेठ असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली त्यातच मालवाहतुकीच्या गाड्या देखील रस्त्यावर आले असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्याची स्थिती वाईट असल्याचे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यानी तक्रारी केल्या
www.konkantoday.com