
रत्नागिरीतील जे. के. फाईल्स कंपनी बंद होण्या मध्ये राज्य शासनाच्या उद्योग विभागाचा कोणताही संबंध नाही – उद्योग मंत्री उदय सामंत
रत्नागिरीतील जे. के. फाईल्स कंपनीने ७ सप्टेंबर रोजी गाशा गुंडाळला पण ती कंपनी बंद होण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागाचा कोणताही संबंध नाही. कंपनी व्यवस्थापनाने कमी पैशात येथील युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांनी कंपनीतून बाहेर पडायला वाढीव पैसे देण्याची मागणी केली. त्यानुसार कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे ती बंद पडल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
जे. के. कंपनीतील कामारांची ७ सप्टेंबरची ड्युटी अखेरची ठरली. कामगार संघटनेच्या काही पदाधिकार्यांनी कंपनीसाठी पोषक भूमिका घेतल्याने कंपनीला कुलूप लागले. त्यामुळे सुमारे ४५ वर्षापूर्वी येथील एमआयडीसीत १९७८ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचा भोंगा बंद झाला आहे. रत्नागिरीतील एमआयडीसीत १९७८ साली ही इंंजिनिअरिंग कंपनी सुरू झाली होती. जे. के. फाईल्स कंपनीच्या उत्पादनाला मागणी घटल्याने ही कंपनी गेल्या जून महिन्यात बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. कंपनीत तयार होणारा माल हा साऊथ आफ्रिकेत पाठवला जात होता. कोरोना काळात तोट्यात गेलेल्या या कंपनी व्यवस्थापनाने बंदचा निर्णय घेतला. व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे कामगारांनी आपली कैफियत आपल्याकडे व्यक्त केली. त्यानंतर या प्रश्नी बैठकाही पार पडल्या. पण कामगार मागणी, कंपनी व्यवस्थापन यांच्यात तफावत निर्माण झाली होती. व्यवस्थापनाने कमी पैशात येथील युनिट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कामगारांनी आपणाला पैसे वाढवून मिळाले तर कंपनीतून बाहेर पडायला तयार असल्याची भूमिका घेतली होती. कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या व ही कंपनी बंद पडली. त्याच्याशी राज्याच्या उद्योग विभागाचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण कंपनीची असलेली येथील १७ एकर जागा दुसर्या कंपनीलाच देण्यात यावी असे एमआयडीसी विभागाला सांगण्यात आले. जोपर्यंत एमआयडीसीकडून या जागेचे हस्तांतरण होत नाही तोपर्यंत येथे अन्य प्रकल्प सुरू होणार नाही. कंपनी जागा परत द्यायला तयार आहे. या जागेवर दुसरा प्रकल्प ाला पाहिजेअशी आपली भूमिका आहे या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कॉम्प्लेक्स किंवा रेसिडेंट कॉम्प्लेक्स होणार नाही जागेसाठी आलेल्या बिल्डरला पळवून लावण्याचे त्यांनी सांगितले
.www.konkantoday.com