कळकवणे-बौद्धवाडी येथे बिबट्याचा गोठ्यात शिरून गुरांवर हल्ला

0
42

चिपळूण: कळकवणे-बौद्धवाडी येथे बिबट्याने गोठ्यात शिरून गुरांवर केलेल्या हल्ल्यात १ गाय मृत्यूमुखी पडली. तर अन्य गुरे किरकोळ जखमी झाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शेतकरी भगवान अनंत गमरे याचा गुरांचा गोठा घराजवळ आहे. रात्रीच्या सुमारास या ठिकाणी गोठ्यात बिबट्याने शिरून गुरांवर हल्ला चढवला. हल्ला केल्याची घटना ग्रामपंचायत सदस्य महेश शिंदे यांना समजताच त्यांनी सदस्य सुरेखा गमरे, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल गमरे यांना सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तत्काळ या संदर्भात वनविभाग आणि अन्य यंत्रणांना याची माहिती देत पंचनामा करून घेतला. या संदर्भात शिंदे यांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करत संबंधित शेतकऱ्याला तत्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी केली आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here