विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीने 10 न्यूज चॅनल्सच्या एकूण 14 टीव्ही अँकर्सना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी न्यूज अँकरची यादीही जाहीर केली आहे. यात सुधीर चौधरी, अर्णब गोस्वामी, चित्रा त्रिपाठी, अदिती त्यागी, अमन चोपडा, अमीश देवगन, आनंद नरसिंहा, अशोक श्रीवास्तव, गौरव सावंत, नविका कुमार, प्राची पाराशर, रुबिका लियाकत, शिव अरूर आणि सुशांत सिन्हा या अँकर्सचा समावेश आहे.यासंदर्भात, काँग्रेसने सोशल मिडियावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे, “रोज सायंकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. यामुळे, आम्ही द्वेशाच्या बाजारात ग्राहक बनून जाणार नाही,” असे INDIA आघाडीने ठरवले आहे. आमचा उद्देश आहे ‘द्वेश मुक्त भारत’. “जुडेगा भारत, जीतेगा INDIA.”
www.konkantoday.com
Home राष्ट्रीय बातम्या I.N.D.I.A आघाडीने 10 न्यूज चॅनल्सच्या एकूण 14 टीव्ही अँकर्सना बॉयकॉट करण्याचा निर्णय...