नौदलाच्या कार्यक्रमात स्वराज्याचे पहिले आरमारप्रमुख मायनाक भंडारी यांचा गौरव व्हावा : अठरापगड जातींची मागणी


   _३ डिसेंबर २०२३ रोजी किल्ले सिंधुदुर्ग वर छत्रपती शिवाजीमहाराजांचे आरमार डोळ्यासमोर ठेवुन नौदलाच्या वतीने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे .या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी , राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु , संरक्षणमंत्री राजनाथसिंग उपस्थित रहाण्याची शक्यता आहे ._ 
        _या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर बसविण्याची घोषणा केली जाणार आहे . छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आरमारप्रमुख मायनाक भंडारी यांनी १८ सप्टेंबर १६७८ साली जगज्येत्या ब्रिटिशांचा सागरी घनघोर समुद्रीयुद्धात दारुण पराभव केला आणि ज्या ब्रिटिशांना पोर्तुगिज , फ्रेंच , डच , सिद्धी कोणीही हरवु शकले नव्हतेत त्यांचा मायनाकांनी  पहिल्यांदाच पराभव करीत  त्यांची सागरपुत्र ही पदवी मोडीत काढली होती . शिवराज्याच्या आरमार उभारणीचे कार्य करीत भारतीय नौदलाचे पुनुरुज्जीवन मायनाक भंडारी यांनी केले. _अल्पावधीत स्वराज्याच्या_ _कोकणी आरमाराने केलेल्या पराक्रमाची दखल म्हणुन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या_ _राज्याभिषेकाच्यावेळी सिंहासनाच्या एका  बाजूला स्वराज्याची राजमुद्रा आणि दुसऱ्या  बाजुला  सोन्याचा भाल्यांना सोन्याच्या मासोळ्या लावुन आरमाराचे प्रतिक म्हणून  गौरव केला होता . मायनाक भंडाऱ्यांच्या_ _दिक्षीमंत पराक्रमाची ईतिहासकारांनी दखल घेतली दिसत नाही . देशाची सागरी सीमा रक्षणासाठी कोकणी आरमाराचा जाज्वल्य पराक्रम पुढे येणे आवश्यक आहे . सिंधुदुर्ग किल्यावर छत्रपतींच्या_ जवळ आरमारप्रमुख मायनाक भंडारी यांचे सुद्धा स्मारक व्हावे असे निवेदन रत्नागिरीतील अठरापगड जातींच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हाधिकारी व रत्नागिरी पालकमंत्री यांना देण्यात_ _आले यावेळी निवेदन देताना रत्नागिरी तालुका भंडारी समाजसंघाची सह सचीव  कु. अमृता_ _मायनाक , ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहीते , तेली समाज_ जिल्हाध्यक्ष रघुवीर *_शेलार , भंडारी समाज तालुकाध्यक्ष राजीव कीर , कटबु समाज अध्यक्ष बी टी मोरे, तेली समाज तालुकाध्यक्ष_ सचीन *लांजेकर , परीठ समाजाचे नेते प्रभाकर कासेकर , भंडारी समाज उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर , गावखडी सरपंच गौतम पाटील ,_ अशोक भाटकर ,गजानन धनावडे , सागर कळंबटे ,श्रीकांत मांडवकर ,मेर्वी सरपंच  शशिकांत म्हादये ,दत्ताराम *मोर्ये ,सिद्धेश चिंदाणे , गोपाळ रोकडे आदी उपस्थित होते .

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button