नातूनगर येथील धरणाच्याकालव्याच्या कामासाठी लागणाऱ्या १ लाख तीस हजार रुपयांच्या सामानाची चोरी
खेड तालुक्यातील नातूनगर बंदिस्त पाटबंधारे उपविभागाच्या
गोडाऊनमधून कालव्यासाठी लागणारे १ लाख २९ हजार ३०० रूपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना १० सप्टेंबर रोजी स. ११ च्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात 4 आले.
त्यानुसार अज्ञातावर
पोलीसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातूनगर येथील धरणाच्या
कालव्याच्या कामासाठी लागणाऱ्या लोखंडी जाड साखळ्या, दगड फोडण्याचे घन, गाडीचा जॅक, लोखंडी स्कू, टाईप गेट आदी साहित्य बंदिस्त गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले होते. हे साहित्य लंपास केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली
www.konkantoday.com