श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा 16 सप्टेंबर रोजी मासिक स्नेह मेळावा
रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा मासिक स्नेह मेळावा शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी चार वाजता श्रीराम मंदिरात संपन्न होणार आहे. यावेळी सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेऊन आगामी उपक्रमाविषयी सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी या स्नेह मेळाव्याला नेहमीप्रमाणे उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन कट्टाचे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये आणि सचिव सुरेंद्र घुडे यांनी केले आहे.
www.konkantoday.com