बजाज फायनान्स कंपनीमध्ये बडतर्फ केलेल्या माजी कर्मचाऱ्याचा प्रताप,ग्राहकाचे कागदपत्रे वापरून लाखो रूपयांचे कर्ज प्रकरण

0
84

रत्नागिरी : बजाज फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्याने ग्राहकाचे कागदपत्रे वापरून लाखो रूपयांचे कर्ज प्रकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुशांत अशोक कोडोलकर असे माजी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला
पोलिसांनी माहितीनुसार सुशांत कोडोलकर हा “दिलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या मजगांव रोड येथील कार्याल कार्यरत होता. त्याला कंपनीकडून बडतर्फ करण्यात आले होते. असे असताना देखील २० मे २०२३ ते २ ऑगस्ट २०२३ दरम्यानच्या काळात सुशांत याने बजाज फायनान्स कंपनीची जुने ग्राहक असलेल्या एका महिलेचे कागदपत्रांच्या आधारे कर्ज प्रकरण करण्याचा प्रताप केला.
सुशांत याने महिलेच्या नावाने १ लाख १० हजार रूपयांचे लोन प्रकरण मंजूर करून घेतले. दरम्यान कर्ज प्रकरण मंजूर केलेल्या महिलेच्या खात्यामधून हफ्त्याच्या रक्कम वजा होण्यास सुरूवात झाली. ही बाब संबंधित महिलेच्या लक्षात आल्याने त्यांनी बजाज फायनान्स कंपनीकडे याबाबत विचारणा केली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here