जाब विचारला म्हणून टॅंकर चालकाला आला राग: निवृत्त अधिकाऱ्याला टँकर खाली चिरडले
नवी मुंबईतील पनवेल परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.पनवेल परिसरातील शहरातील तारा गावाच्या हद्दीत एका टँकरने एका ६० वर्षीय पुरुषाला चिरडले आहे. यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पनवेल परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. श्रीकांत मोरे (६०) असे अपघात मृत्युमुखी पडलेल्या पुरुषाचे नाव आहे.
जाब विचारला म्हणून टॅंकर चालकाला आला राग:
संबंधित घटना नवी मुंबई परिसरातील पनवेल येथील तारा गावच्या हद्दीत घडली आहे. सेवानिवृत्त मंडळ अधिकारी श्रीकांत मोरे हे त्यांच्या खासगी कारने पत्नीसह शनिवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा हायवेवरून पनवेलहून अलिबागच्या दिशेने निघाले होते. याप्रवासादरम्यान तारा गावाजवळील उड्डाण पुलाजवळ एका टॅंकरने मोरे यांच्या कारला पाठीमागून धडक मारली. यामुळे त्यांच्या कारचे नुकसान झाले. याप्रकरणी श्रीकांत मोरे हे त्यांच्या कारमधून उतरले व संबंधित टँकर चालकास जाब विचारला. त्यामुळे टॅंकर चालकाला मोरे यांचा प्रचंड राग आला. त्याने श्रीकांत मोरे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना फरफटत नेऊन चिरडले.
www.konkantoday.com