
गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, पालकमंत्रीही निवडले जाणार-खासदार सुनिल तटकरे
गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि पालकमंत्रीदेखील निवडले जातील. राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळेल, असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहेे.
दरम्यान, खासदार सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार यांच्यामुळेच आम्ही मोठे झालो आहोत, पण आम्ही देखील पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आमची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. www.konkantoday.com