कोरोना काळात काम केलेल्या आशा व स्वयंसेविका महिलांना केलेल्या कामाचा मोबदला देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोरोना कालावधीत माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेत काम केलेल्या आशा व स्वयंसेविका महिलांना केलेल्या कामाचा मोबदला देण्याची व २०१९ निवडणुकीत बुथवर काम केल्याचा मोबदला देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यानी घेतलेल्या बैठकीवेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, आशा वर्कर संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विजय शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, अभिजित कांबळे व दोन आशा उपस्थित होत्या. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी माहिती जाणून घेतली. जिल्हा परिषदेने त्यांच्या फंडामधून माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी या २०२१ मध्ये घेतलेल्या मोहिमेच्या कामाचा मोबदला सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना द्यावा. तसेच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस बुथवर काम केलेल्या आशांना त्यांचा कामाचा मोबदला देण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.
www.konkantoday.com