आता मध्य रेल्वेने क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला, रेल्वेत घाण करणाऱ्यांवर कारवाई होणार

0
50

मुंबई महापालिकेच्या अपयशी प्रयत्नानंतर आता मध्य रेल्वेने क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेस्थानक आणि गाड्यांत थुंकणारे, घाण करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी त्‍यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर क्लीनअप मार्शलची नियुक्ती लोकमान्य टिळक टर्मिनसवर करण्यात येणार आहे. याकरिता निविदा काढण्यात आल्‍या आहेत.मुंबई विभागातील रेल्वेस्थानकांवर किंवा धावत्या गाडीत थुंकणाऱ्या आणि कचरा करणाऱ्या प्रवाशांविरोधात अनेकदा रेल्वेकडून कारवाई करण्यात येते. याशिवाय ‘थुंकू नका’ अशी उद्‌घोषणा करण्यात येते; मात्र थुंकणाऱ्यांची आणि रेल्वे परिसरात कचरा करणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. तसेच प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे आता मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मध्य रेल्वेने निविदा मागवल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here