रत्नागिरीचा सन्मान, राजापूर हायस्कुलचे संगीत शिक्षक उमाशंकर दाते यांचा G – 20 सांस्कृतिक कार्यक्रमा मध्ये सहभाग


राजापूर तालुक्यातील आडिवरे गावचे सुपुत्र उमाशंकर (बाळ) दाते ( नवेदर, आडीवरे तालुका राजापूर जि रत्नागिरी ) याना जागतिक दर्जाच्या अश्या G20 summit 2023 च्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे . यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे .
उमाशंकर दाते हे राजापूर हायस्कुलमध्ये कलाशिक्षक असुन त्यानी कालबाह्य झालेल्या रिड ऑर्गन या वाद्याच्या पुननिर्मितीला १० वर्षापुर्वी सुरुवात केली व त्यात यश मिळवले .
जुन्या शास्त्रिय संगित नाटकामध्ये या रिड ऑर्गनचा वापर केला जायचा मात्र काळाच्या ओघात हे रिड ऑर्गन कालबाह्य झाले होते .
उमाशंकर दाते यानी या कालबाह्य झालेल्या रिड ऑर्गनला पुन्हा ऊर्जित अवस्था आणण्यात यश मिळवले आहे .
त्यानी बनवलेले हे रिड ऑर्गन देशाबाहेर जात आहेत .
उमाशंकर दाते हे स्वत: या रिड ऑर्गनचे उत्कृष्ट वादक आहेत . त्यानी खुप मेहनतीने व जिध्दीने यामध्ये प्राविण्य मिळवले आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button