अल्पवयीन युवतीशी बालविवाह करत मातृत्व लादल्याप्रकरणीतरुणास अटक.

0
43

खेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीशी बालविवाह करत मातृत्व लादल्याप्रकरणी येथील पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणास शुक्रवारी अटक केली. अटकेतील तरुणास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता ४ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मृणाल जाडकर यांनी काम पाहिले. पीडित युवतीचे तालुक्यातील एका गावातील तरुणाशी धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. या लग्नास दोन्ही कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. मात्र अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही बालविवाह करत सातत्याने शारीरिक संबंध ठेवून मातृत्व लादल्याची तक्रार पीडित युवतीने येथील पोलीस स्थानकात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तरुणास अटक केली असून अधिक तपास येथील पोलीस करत आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here