केळशी गावात गोकुळाष्टमी उत्सव पारंपारिक पद्धतीने झाला साजरा
दापोली तालुक्यातील केळशी गावात गोकुळाष्टमी उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. नवानगर मंडळींसह केळशी गावातील आळया, वाडया आणि पाखाडयांचे गोविंदा पथकांचे मेळ पारंपारीक खालू बाज्या अर्थातच ढोल सनई वादयाच्या तालावर एकापेक्षा एक अशा लयबध्द गाण्यांच्या तालावर थिरकत गोविंदा आप आपल्या पायंडयांवर थिरकत होते.गोविंदा मेळयातील अगदी लहानांपासून वृध्दांनी आपल्या डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी तर अंगावर शुभ्र पांढरे नवे सदरा लेंगा वस्त्र परिधान केले होते. केळशीतील वाडया, आळया, पाखाडयांमधील गोविंदे ग्रामदैवत श्री कालभैरव मंदिरापर्यंत दरवर्षीच्या रिती रिवाज पंरपंरेनुसार आपल्या वाडीतून आले. एका एका गोविंदा पथकाने श्री कालभैरव मंदिराच्या परसावर येवून आपली मानाची फेरी मारली. दहापेक्षा अधिक गोविंदा पथक एकत्र येवून सुद्धा शिस्तीत बाधा नव्हती. शिस्तबध्द पध्दतीने गोविंदे आपल्या पायंडयावर गाण्यांच्या तालावर पायंडा न चुकता नाचत होते. केळशी येथील लोकांनी आपल्या उत्सवाच्या परंपरेची खासियत वर्षोनुवर्ष त्याच भावनेने जपून ठेवली आहे.
www.konkantoday.com