लांजा बसस्थानकात शौचालयाचे लोकार्पण

0
43

लांजा बसस्थानकातील सार्वजनिक शौैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैचालयाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी पार पडला. यावेळी आमदार राजन साळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा बसस्थानकातील शौचालकाची दुरवस्था झाली होती. प्रवासी वर्गाची होणारी गैरसोय लक्षात घेवून आमदार राजन साळवी यांच्या स्थानिक विकास निधी योजनेंतर्गत शौचालय बांधकामासाठी ९.१५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीतून शौचालयाचे काम पूर्ण झाले होते. तसेच आमदार राजन साळवी यांच्या स्थानिक विकास निधीतून बसस्थानकातील आरक्षण खिडकीजवळ शेड बांधणे या कामाचा भूमिपूजन सोहळाही यावेळी पार पडला. याप्रसंगी आमदार राजन साळवी यांच्यासह लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर तसेच शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख संदीप दळवी, शहरप्रमुख नागेश कुरूप, युवा सेनेचे तालुका अधिकारी प्रसाद माने, विभाग संघटक रविंद्र डोळस, उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, नगरसेवक स्वरूप गुरव, राजेश हळदणकर, लहू कांबळे आदी उपस्थित होते. www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here