रत्नागिरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज व विठ्ठलाच्या भव्य मूर्ती उभारण्यात येणार
रत्नदूर्ग किल्ला येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम सुरू झालेले आहे. यात शिवाजी महाराज यांचा २४ फुटी उभा पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच थिबा पॅलेस येथे संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे.त्याचबरोबर आषाढी आणि कार्तिकीला रत्नागिरी जिल्ह्यातून ढरपूरला भक्त जातात, त्यामुळे पंढरपूरच्या विठोबाची सर्वाधिक उंच मुर्तीही रत्नागिरी शहरात उभारण्यात येणार आहे. तसेच संसारे गार्डनमध्ये ध्यान केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांन दिली.
पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी रत्नदूर्ग (भगवती) किल्ला येथे भेट देऊन उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी केली व आढावा घेतला. तसेच संसारे गार्डन येथे आठ कोटी खर्चातून उभारण्यात येणाऱ्या ध्यान केंद्राच्या ठिकाणाचीही पाहणी केली. याबाबत तात्काळ आराखडा तयार करुन लवकरात लवकर निविदा प्रक्रीया पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती, त्यांनी दिली. संभाजीराजे यांचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुतळा तयार झाला आहे. तो थिबा पॅलेस येथे उभा रहातोय, त्याचे प्रेझेंटेशन देण्यात आले आहे. तसेच पंढरपूरच्या विठोबाची देखील महाराष्ट्रातील सर्वात उंच मुर्ती रत्नागिरी शहरात होतेय, त्याचीदेखील जागा निश्चित झाली आहे. पैसे देखील वर्ग केले आहेत. या सगळ्या गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
मार्लेश्वर, भाट्ये याठिकाणी प्रत्येकी पाच कोटी रूपये खर्च करून या पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. पर्यटकांचीही चांगली सोय करणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले.
www.konkonkantoday.com