खेड तालुक्यात वादळी पाऊस गोठा कोसळल्याने दोन जनावरांचा मृत्यू
खेड तालुक्यातील तळे देउळवाडी येथील शेतकरी सुनिल रामचंद्र दोडेकर यांचा गुरांचा गोठा शुक्रवारी रात्री पावसा मूळे जमीन दोस्त होऊन दोन गायींचा मृत्यू झाला तर अन्य जनावरे जखमी झाले आहेतशुक्रवारी सायंकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली होती ग्रामीण भागात पावसाने विजेच्या कडकडाटा सह मुसळधार कोसळत होता याच पार्श्वभूमीवर तळे येथे वाडा जमीनदोस्त झाला या मध्ये सुमारे चार ते पाच जनावरे गोठ्या मध्ये अडकून पडले होते त्यातील काही जनांवराणा वाचवण्यात यश आले मात्र दोन गायींचा मृत्यू होऊन शेतकरी दोडेकर यांचे नुकसान झाले
www.konkantoday.com