कुडाळ रेल्वे मार्गावरील कुडाळ नाबरवाडी येथे रेल्वे रुळावर मृतदेह आढळला
कुडाळ रेल्वे मार्गावरील कुडाळ नाबरवाडी येथे कुडाळवरून गोव्याच्या दिशेने जाणार्या रेल्वे मार्गावर एकाचा मृतदेह आढळला. कुडाळ रेल्वे स्टेशनपासून 344 मैल दगडाजवळ 30 ते 35 वयोगटातील परप्रांतीय अज्ञात युवक मृत स्थितीत कुडाळ पोलिसांना आज (शुक्रवार) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आढळला.सदर युवकाने जीवन संपवले असल्याचा प्राथमिक अंदाज कुडाळ पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कुडाळ वरून गोव्याकडे जाणार्या रेल्वे ट्रॅकवर हा मृतदेह आढळुन आला आहे. दरम्यान घटनास्थळी कुडाळ पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलिस हेड कॉन्स्टेबल ओंकार पाटील व परूळेकर यांनी धाव घेत पंचनामा केला व सदरचा मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह कुडाळ येथील शवागृहात ठेवला आहे. याबाबतचा अधिक तपास कुडाळ पोलिस करत आहेत.
www.konkantoday.com