कोतवडेत ग्रामविकासअधिकाऱ्याला धमकावले ,एका विरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे घरकुलाचे काम केले नसल्याच्या रागातून ग्रामविकास अधिकाऱ्याला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडली. देवीदास शामराव इंगळे (५६) असे ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी नितीन गंगाराम चरकरी याच्याविरूद्ध धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. , देवीदास इंगळे हे कोतवडे येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करतात. ३० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २.३०च्या सुमारास देवीदास हे कोतवडे ग्रामपंचायत येथे नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी जात होते. यावेळी नितीन चरकरी याने देवीदास यांना वाटेत थांबवून तु माझे घरकुलाचे काम का केले नाहीस, असे बोलून शिवीगाळ व दमदाटी केली, अशी तक्रार देवीदास यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नितीन चरकरीविरुद्ध भादंवि कलम ३४१,५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला.
www.konkantoday.com