
पोस्ट विभागाने रत्नागिरीतील जिल्ह्यातील बहिणींसाठी बजावली मोलाची कामगिरी
जिल्ह्यातील बहिणींनी रत्नागिरी टपाल कार्यालयावर विश्वास टाकत तब्बल आपल्या १२ हजार भाऊरायांपर्यंत राख्या पोहोच केल्या आहेत.महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांमध्ये पोस्टाच्या आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफ्यामधून या राख्या पाठविण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी विभागाने जिल्ह्यासाठी ३ हजार विशेष अशा आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफ्यांची मागणी केली होती. हे आकर्षक, वाॅटरप्रूफ लिफाफे केवळ दहा रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले होते. पोस्टाच्या सर्व कार्यालयात हे लिफाफे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. गतवर्षीही पोस्टाच्या या आकर्षक लिफाफ्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
www.konkantoday.com