रत्नागिरी प्रमाणे आता रायगड मध्ये ही सापडली समुद्रकिनारी चरसची पाकिटे
श्रीवर्धन समुद्र किनार्यावर चरसची पाकीटे सापडल्यानंतर, दुसर्या दिवशी सोमवारी (29 ऑगस्ट) हरिहरेश्वर किनार्यावर चरसची 29 पाकीटे आढळून आल्याने श्रीवर्धनमध्ये खळबळ उडाली आहे. पिशव्यांचे वजन 29 किलो व काही ग्रॅम असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. अशा प्रकारची आणखी पाकीटे मिळण्याची शक्यता असून, सदर पाकीटे कोणाला आढळून आल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
रत्नागिरी समुद्रकिनारी चरसची पाकीटे सापडल्यानंतर रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारी अशा प्रकारची पाकीटे किंवा इतर संशयास्पद वस्तू आहे का? याबाबत शोध मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व सागरी पोलीस ठाणे हद्दीतील मच्छीमार सोसायट्या आणि सागरी सुरक्षा रक्षकांना सतर्क करण्यात आले होते. ही शोध मोहीम सुरू असताना रविवारी (27 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धन समुद्र किनार्यावर येथे रत्नागिरी जिल्ह्यात सापडली तशाच प्रकारची 9 पाकिटे मिळून आली
www.konkantoday.com