Success mantra for JEE and NEET या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

0
91

टी.पी.केळकर कॉलेज c/o फाटक हायस्कूल,कॅप्सन इन्स्टिट्यूट,व लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख, न्यू रत्नागिरी, हातखंबा रॉयल या झोन ३ रिजन ५ मधील पाच क्लब, यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवेश परीक्षांना सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते..या साठी मार्गदर्शक म्हणून मुंबई चे डॉ महेश अभ्यंकर यांना आमंत्रित करण्यात आले होते… यावेळी मुख्याध्यापक किर सरांनी सर्वांचे स्वागत केले व लायन्स क्लब च्या झोन चेअरपर्सन ला.श्रेया केळकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली व‌ या व्याख्यानाच्या नियोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल फाटक हायस्कूल आणि कॅप्सन इन्स्टिट्यूट चे विशेष आभार मानले. डॉ महेश अभ्यंकर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरच्या दृष्टीने जेईई आणि नीट या परिक्षा किती महत्वाच्या आहेत याबाबत माहिती दिली..या परीक्षांसाठी कसा अभ्यास करावा, किती वेळ त्यासाठी द्यावा,अभ्यासाचे योग्य नियोजन करताना त्याचे टाइमटेबल कसे तयार करावे,क्लास आणि कॉलेज मधे शिकवणारा अभ्यासक्रम याचे योग्य नियोजन करून पालकांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने पेपर्स सोडवण्याचा सराव कसा आणि किती करावा याबाबत सुद्धा खूप छान मार्गदर्शन केले..तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य सुद्धा कसे जपावे याबाबत सुद्धा माहिती दिली….व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन सुद्धा केले..३००-३५० विद्यार्थी व पालक या प्रसंगी उपस्थित होते.. फाटक हायस्कूल चे भाताडे सर भावे मॅडम व इतर शिक्षकवृंद,कॅप्सन इन्स्टिट्यूट चे निकम सर,पाटील सर व इतर शिक्षकवृंद तसेच लायन्स क्लब चे अध्यक्ष सचिव झोन चेअरपर्सन व इतर सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.. यामध्ये लायन श्रेया केळकर,ला.शिल्पा पानवलकर,ला.संजय पटवर्धन,ला.दर्शन पवार,ला.मेघना शहा,ला.प्रसाद हातखंबकर,ला.प्रतिक कळंबटे,ला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here