शिवतर येथील तलाठ्याला पाचशे रुपयाची लाच स्वीकारताना अटक

0
99

खेड तालुक्यातील शिवतर येथील तलाठी अमोल महावीर पाटील (३१ वर्षे), तलाठी सजा शिवतर, याला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून जेरबंद केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन सन २०१४ साली झाले होते. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या जमीन मिळकतीचा वारस तपास होऊन तक्रारदार यांची नावे दाखल करण्यास तलाठी अमोल पाटील सजा शिवतर याने तक्रारदार यांच्याकडे १ हजारांची लाच रक्कमेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकारी यांना दिली होती. त्या अनुषंगाने दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी या तक्रारीची पडताळणी केली होती. त्यानंतर ५०० रुपयांची लाच रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, आज, दि. २८ ऑगस्ट रोजी सापळा रचून लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here