चेष्टा मस्करी मधून झाला वाद तरुणावर केले चाकूने वार

चेष्टा मस्करी रूपांतर वादात झाल्याने तरुणावर चाकूने वार होण्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यात घडला आहे
रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे-सांडमवाडी येथे किरकोळ कारणातून तरुणावर चाकूने सपासप वार केले. ही घटना सोमवारी (दि. 28) दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली
अक्षय अशोक हळदणकर (25,रा.सांडमवाडी गावडेआंबेरे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात जखमी प्रथमेश मंदार तिवरेकर (23, रा. सांडमवाडी गावडेआंबेरे, रत्नागिरी) याने पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 28) दुपारी 2 वाजताच्या सुमारास प्रथमेश व अक्षय हे दोघेही गावडेआंबेरे एसटी स्टॉपवर होते. या दोघांच्यात एकमेकाची चेष्टा-मस्करी सुरु होती. काही वेळानंतर दोघांमध्ये अचानकपणे वाद निर्माण झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान संशयित आरोपी अक्षय हळदणकरने सोबत लपवून आणलेल्या चाकूने प्रथमेशच्या उजव्या काखेत, उजव्या हाताच्या खांद्यावर आणि त्याच खांद्यावर पाठीमागे वार केले. यामध्ये प्रथमेश गंभीररित्या जखमी झाला. जखमी प्रथमेशला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी संशयित अक्षय विरोधात भादंवि कायदा कलम 326 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल पी.टी.कांबळे करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button