कोकण रेल्वेच्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाच्या कामांचे आज मंगळवारी मुख्यमंत्र्यांचे हस्ते ऑनलाइन भूमिपूजनरत्नागिरीसह 12 स्थानकांचा होणार कायापालट
कोकण रेल्वेच्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाच्या कामांचे आज मंगळवारी मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार आहे
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड , चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, व राजापूर , रेल्वेस्थानक यांना जोडणाऱ्या काँक्रीटीकरण व सुशोभिकरणाचे आज मंगळवार दि. 8 ऑगस्ट 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच केंद्रीय मंत्री सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, यांची प्रमुख उपस्थिती आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कीर्ती कुमार पूजार, सह
रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे छाया नाईक,उपस्थित राहणार आहेत.
खासदार विनायक राऊत,खासदार सुनील तटकरे आमदार, निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार भास्कर जाधव , आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी देवेंद्र सिहं उपस्थित राहणार आहेत.
कोकण विभाग सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, श्रीमती छाया नाईक अधीक्षक अभियंता सा. बा. मंडळ रत्नागिरी श्री. अमोल ओटवणे कर कार्यकारी अभियंता उत्तर रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी श्री. अमरजीत रामशे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण तसेच जनक धोत्रेकर अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कळविले आहे
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या एकूण १२ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे रस्ता काँक्रीटकरण व सुशोभीकरण या कामाचे भूमिपूजन होणार आहे.
कोकण विभागामध्ये पर्यटनास चालना देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाचे देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभिकरण करण्याचे नियोजन केले आहे.
त्यासाठी सामंजस्य करार कोकण रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वेस्थानापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत.
एकूण ३७ रेल्वे स्थानकांपैकी पर्यटनदृष्ट्या महत्वाचे व सतत प्रवाशांची वर्दळ असणारे १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानक वीर, माणगाव व कोलाड. व रत्नागिरी जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानके चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर व खेड.
या कामांना राज्य शासना मार्फत मंजूरी प्रदान केली असून सन मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पामध्ये 12 कामांकरिता 56.25 कोटी इतक्या रक्कमेच्या कामांचा समावेश करण्यात आला असून आजमितीस या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करण्यात येत आहेत.
रेल्वे स्थानक सुशोभीकरण अंतर्गत ठळक बाबी :- रेल्वे स्थानकांच्या पोहोच रस्त्याचे काँक्रीटकरण करणे, Street Lightening, पेव्हड शोल्डर व आर.सी.सी. गटर्स बांधणे.
महिला व पुरुष प्रवाशांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी करण्याचे काम अंतर्भूत आहे.
प्रवाशांसाठी स्थानक परिसरात Station Plaza उभारणे. प्रवाशांसाठी स्थानक परिसरात Bus Stop बांधणे. Station Plaza अंतर्गत प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाची (waiting area) व्यवस्था करणे.
उन पाऊस यांच्यापासून संरक्षणासाठी कायम स्वरुपी Canopy तयार करण्यात येणार आहे.
येणाऱ्या जाणान्या प्रवाश्यांची Entry & Exit करिता सायकल दुचाकी, चारचाकी, बस व रिक्षासाठी Chanellized Parking यी व्यवस्था करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com