अभिनेत्री मीरा जोशी हिचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात
मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक आणि चिंतेची वार्ता समोर आली आहे. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. अनेक मालिका, रिएलिटी शो, चित्रपट अशा विविध माध्यमातून झळकणाऱ्या अभिनेत्री मीरा जोशी हिचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गवार अपघात झाला आहे.संदर्भात अभिनेत्रीने स्वतः सोशल मिडियावर पोस्ट सह शेयर करत माहिती दिली आहे. मीरा जोशी ही मूळची रत्नागिरीची आहे
या अपघातात अभिनेत्रीला फारशी इजा झाली नसली तरी तिच्या गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. तिची गाडी दुभाजकावर धडकल्याने गाडीला जबर फटका बसला आहे. अभिनेत्रीने गाडीचे काही फोटो आणि एक व्हिडिओ शेयर करत या अपघताची माहिती दिली आहे.
www.konkantoday.com