रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे राहणारी प्रमिला प्रभाकर जाधव (६६) ही घरातल्या बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने बेशुद्ध झाली होती. तिला बेशुद्धावस्थेत मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला अधिक उपचारासाठी शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार चालू असताना तिचे निधन झाले.
www.konkantoday.com