ट्रेडींगच्या नावाखाली ६२ लाखांची ऑनलाईन फसवणूक, ११ जणांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

0
108


रत्नागिरी शहरातील एकाची तब्बल ६२ लाख ४६ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी ११ जणांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी ते २९ एप्रिल २०२३ यादरम्यान फिर्यादीच्या व्हॉट्स अॅप मोबाईल क्रमांकावर वेल्थ पासवर्ड ३१४१ नामक व्हॉट्स अॅप ग्रुपवराऊंट नंबर ८१२३२५९२८६ अनोळखी मोबाईल क्रमांकधारकाने फिर्यादी यांना या व्हॉट्सअॅप ग्रुपला,समाविष्ट केले. यानंतर फिर्यादी यांना ४४७५३४०१५६५५ या अनोळखी संशयित मोबाईल धारकानें https//:ww.zfgold. top/softapp ही रजिस्ट्रेशन लिंक पाठवली आणि त्यावर ट्रेडिंग अकाऊंट उघडण्यास सांगितले. यानंतर फिर्यादी यांनी त्यांची पत्नी सिया प्रसादे हिच्या या कंपनीचे ट्रेडिंग अकाउंट उघडण्यात आले यानंतर फिर्यादी आणि गुंतवलेले रक्कम सात पटीने फायदा करून
रक्कम ही परतावा दिला जाईल असे सांगत फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून पाठवलेल्या लिंक आधारे पत्नी सिया प्रसादे या नावाच्या अॅक्सिस बँकेच्या आणि फिर्यादी यांच्या या बँकेच्या खात्यावरून फिर्यादी यांना संशयित आरोपी यांनी सहा जणांच्या वेगवेगळ्या खात्यावर एकूण 62 लाख 46 हजार रुपये पाठवण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी हे रक्कम पाठविण्यात आली परंतु त्यांना कोणताही परतावा न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत असल्याने पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात 11 जणांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे
जिल्हा पोलीस खात्याकडून वारंवार ऑनलाइन फसवणुकीबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करूनही असे प्रकार परत घडत आहेत
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here