सामना हे वृत्तपत्र आता शरद पवार यांना सल्ला देण्या एवढा मोठा झाला आहे हेफार मोठे आश्चर्य आहे अशी जोरदार टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे
राज्यातील अनैसर्गिक सरकार पडल्यामुळे काही लोकांना जे दुःख झाले आहे त्या निराशे मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबर असलेले आमदार खासदार यांच्यावर खालच्या पातळीवरून टीका केली जात आहे महाराष्ट्र राज्याला राजकीय संस्कार आहेत राजकीय संस्काराची पायमल्ली सामना मधून कायमस्वरूपी होत आहे एकीकडे सामन्याच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाच्या जाहिराती असतात त्यावर प्रंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा फोटो असतो मात्र जाहिराती संपल्यावर शिंदे फडणवीस सरकारवर खालच्या पातळीवर टीका केली जाते बारसू रिफायनरी बाबत जसे दुपट्टी धोरण आहे तसेच सामना वर्तमानपत्र चालवताना दुपट्टीपणा आहे
आता शरद पवार यांच्या कार्यप्रणाली व नेतृत्वावर देखील शंका व्यक्त करण्याचा महापराक्रम सामनाने केला आहे सामान्य मधून आमच्यावर करण्यात आलेला टीकेचा मी जाहीर निषेध करतो तसेच या टीका करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा सामंत यांनी दिला आहे
www.konkantoday.com