राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा केली.त्यापूर्वी भास्कर जाधव हे आपल्या कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांसह बारसूकडे जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. तेव्हा भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
‘रस्ता काय तुमच्या मालकीचा आहे का?’, असा संतप्त संवाल भास्कर जाधव यांनी पोलिसांना विचारला.
बारसूच्या आंदोलनस्थळी जात असताना गाडी अडवल्यानंतर भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये वाद झाला. “गाडी अडवण्याचं कारण काय? कोणत्याही कारणाशिवाय गाडी का अडवत आहात? कारण नाही अशी भाषा वापरायची नाही,” अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी खडेबोल सुनावले.
परवानगी घेऊन या असे पोलिसांनी सांगितल्यावर भास्कर जाधव म्हणाले, “कोणाची परवानगी आणायची आहे? तुम्हाला पोलीस अधिक्षकांनी काय परवानगी दिली आहे. किंवा काय लिहून दिलं आहे, जरा पाहू. तुमची नेमणूक केली असल्याने, तुम्हाला बोलतोय. नाहीतर बोलण्याची गरज काय होती?.”
“घमेंडी आणि दादागिरीत बोलायचं नाही. सौजन्याने बोला. तुम्ही कोणाशी बोलताय. अंगावर कपडे घातले म्हणून वाटेल, तसे वागायचं नाही. रस्ता काय तुमच्या मालकीचा आहे काय?,” असा सवाल भास्कर जाधव यांनी पोलिसांना विचारला
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली, रस्ता काय तुमच्या मालकीचा आहे का?’,...