आंब्याच्या झाडावर आंबे काढण्यासाठी गेलेल्या तरूणाचा इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागल्याने मृत्यू

चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील राहणार्‍या फरीदा अपार्टमेंटमध्ये राहणारा आफताब सलीम सुर्वे या २३ वर्षीय तरूणाचा आंबे काढण्यासाठी झाडावर चढला असता वायरचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. आफताब हा कोटमाठला पेठमाप येथे आंब्याच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढला असता आंबे काढण्याच्या नादात आंब्याच्या झाडाला लागून असलेल्या ११ के.व्ही. इलेक्ट्रीक वायरचा जोरदार शॉक बसला. त्याला गंभीर अवस्थेत कामथे उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button