
प्रकल्पांना विरोध करण्याची मानसिकता लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांनी बदलण्याची गरज – माजी आमदार डॉ. विनय नातू
रत्नागिरी : असंख्य तरुणांना रोजगार देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पंचतारांकित एमआयडीसी, विविध प्रकल्पांना विरोध करण्याची मानसिकता लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांनी बदलण्याची गरज असल्याचे मत भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील प्रकल्पासंदर्भातील बाहेरील व्यक्तींनी भाष्य करणे कटाक्षाने टाळावे अशी अपेक्षा डॉ. नातू यांनी व्यक्त केली आहे.
रत्नागिरीतील स्टरलाईट प्रकल्प, निवळी पंचतारांकित एमआयडीसी, गुहागरातील एन्रॉन कंपनी, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी, चिपळूण तालुक्यातील मार्ग ताम्हाने एमआयडीसी, राजापूर तालुक्यातील नाणार प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द करावा लागला आहे. बारसू येथील नियोजित रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध अनपेक्षित असल्याची भूमिका डॉ. विनय नातू यांनी मांडली.
www.konkantoday.com