रिफायनरीचा विरोध पेटला; रस्त्यावर झोपून महिलांनी अडवल्या पोलिसांच्या गाड्या, महिलांना ताब्यात घेण्यात आले
राजापूर येथे बारसू-सोलगावमध्ये होणाऱ्या रिफायनरी विरोधातील आंदोलंन चांगलेच पेटले आहे. आज आंदोलनाचा दूसरा दिवस असून आंदोनक महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांचा ताफा अडवला.
कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा विरोध वाढला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी देखील मोठा विरोध पाहायला मिळाला. सकाळपासून आंदोलक जमले होते. त्यांनी प्रकल्पाच्या जागी धरणे धरले होते. दरम्यान, आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे पोलिस आंदोलन स्थळी येत असतांना आंदोलक महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांचा ताफा अडवला. यावेळी अनेक आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केली.
रत्नागिरी येथे बारसू-सोलगावमध्ये होणाऱ्या रिफायनरी विरोधातील आंदोलंन चांगलेच पेटले आहे. आज आंदोलनाचा दूसरा दिवस आहे. या ठिकाणी तब्बल २ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहे. काल या प्रकल्पाच सर्वे करण्यासाठी एक समिती गेली होती. या समितीला आंदोलकांनी विरोध केला. दरम्यान, काल देखील मोठा विरोध झाला. आज सकाळी आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांचा ताफा आंदोलक महिलांनी अडवून धरला. सकाळी साडे आठच्या सुमारास महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. काही ही झाले तरी तरी हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली.
विरोधी करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे रवानगी रत्नागिरी येथे करण्यात आली आहे
www.konkantoday.com