माजी आमदार संजय कदम यांच्यासह अजिंक्य मोरे, अक्षय पाटणे व अन्य 20 ते 25 जणांच्या जमावाविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
74

कोकणात खेड तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. खेड तालुक्यात पंचायत समिती मधील एका बैठकीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचा प्रकार घडला होता.या सगळ्या प्रकरणी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यासह अजिंक्य मोरे, अक्षय पाटणे व अन्य 20 ते 25 जणांच्या जमावाविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्या राड्यानंतर खेडचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी आपल्याला ठार मारण्याच्या उद्देशाने काठ्या व सळ्या घेऊन आपल्या मागावर पंचायत समिती येथे आले होते बाकीच्यांनी सोडवा सोडव केल्याने आपण वाचलो अन्यथा आपल्याला ठार मारले असते अशी गंभीर स्वरूपाची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी ‘तू बाहेर भेट तुला ठार मारून टाकतो’ अशी धमकी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.
खेडचे शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी तक्रारीत दाखल केली आहे. 12 एप्रिल रोजी बुधवारी खेड पंचायत समिती येथे जलजीवन मिशन (पाणी पुरवठा) संदर्भात अधिकारी आणि ठेकेदार यांची मिटींग आयोजित करण्यात आलेली होती असे आम्हाला समजल्यावर आमचे  विभाग प्रमुख दिलीप राणे हे खेड पाणी पुरवठा विभाग ऑफिसमध्ये गेले असताना त्यावेळी अधिकारी विष्णु पवार यांना भेटले व मिटींग संदर्भात माहिती घेतली. त्यावेळी विष्णु पवार यांनी सांगितले की, सदरची मिटींग ठेकेदार आणि अधिकारी यांचेमध्ये होणार आहे. तेथे कोणत्याही राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना बसवुन दिले जाणार नाही. त्यानंतर आम्ही आमचे कामानिमित भरणे येथे असताना आमचे पदाधिकारी शांताराम म्हसकर, तालुका सचिव खेड, व रामचंद्र ऐनकर माजी सभापती खेड, हे पंचायत समिती खेड येथे दुपारी पावणेदोन च्या सुमारास गेले असता त्याठिकाणी माजी आमदार संजय कदम व त्याचे सहकारी त्या मिटींगला बसलेले दिसुन आले. त्यानंतर म्हसकर व ऐनकर यांनी भरणे येथे आल्यानंतर ही गोष्ट मला सांगितली. त्यानंतर मी स्वत: रामचंद्र ऐनकर, शांताराम म्हसकर, दिलीप राणे, कुंदन सातपुते व माझे अन्य सहकारी पंचायत समिती खेड येथे दुपारी सव्वादोन चे सुमारास आलो त्यावेळी पंचायत समिती मध्ये आल्यानंतर पंचायत समिती सभागृहामध्ये जलजीवन मिशन (पाणी पुरवठा) संदर्भात मिटींग चालु होती, त्या मिटींगला खेड, पाणीपुरवठा अधिकारी विष्णु पवार, रत्नागिरी जिल्हा परिषद येथील पाणीपुरवठा अधिकारी श्रीमती पाटील इतर शासकिय अधिकारी, ठेकेदार,माजी आमदार संजय कदम,शंकर कांगणे, अजिंक्य मोरे, अक्षय पाटणे व माजी आमदार संजय कदम यांचे पक्षाचे अन्य चार  सहकारी उपस्थितीत होते. तेथे गेल्यानंतर आपण अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला की, ही मिटींग फक्त ठेकेदार व अधिकारी यांची होती असे आमच्या पदाधिकारी यांना सांगितलं. व ‘तुम्हाला मिटींगला बसता येणार नाही असे बोललात. मग या ठिकाणी आमच्या विरोधी पार्टीचे लोक उपस्थितीत कसे? असे विचारले असता संजय कदम जागेवरून उठुन माझ्या अंगावर धावत येवुन पाण्याची बाटली फेकुन मारण्याचा प्रयत्न केला. व त्यानंतर त्याठिकाणी संजय कदम यांचे सहकारी यांनी गदारोळ करुन अजिंक्य मोरे याने धक्काबुक्की केली. अक्षय पाटणे हा अंगावर धावत येवुन जीवे मारण्याची धमकी दिली. तु बाहेर भेट, तुला ठार मारून टाकतो अशी धमकी दिली. त्यावेळी अक्षय पाटणे याला तेथील उपस्थितीत लोकांनी सभागृहाच्या बाहेर ओढत घेवुन गेले. व त्यानंतर पुन्हा संजय कदम व त्याचे सहकारी यांनी सभागृहात गदारोळ घातला व निघुन गेले असे धाडवे यांनी आपल्या जबाबात नमूद केले                                   त्यानंतर मी व माझे सहकारी पंचायत समिती सभापती केबीन मध्ये जावुन बसलो. व आमच्या विकास कामाबाबत माझ्या सहका-यांशी दुपारी 02.45 वा. चर्चा करत असतेवळी संजय कदम यानी त्यांचे गावातील व तालुक्यातील 20 ते 25 जणांना काठ्या व लोखंडी सळ्या घेवुन आम्हांला मारण्यास पाठविले. व त्यानंतर आम्ही तेथुन बाहेर पडलो. व गाडीमध्ये बसायला आलो असताना त्यांच्या दोन गाड्या आमच्या गाडीच्या पाठीमागे लावुन ठेवलेल्या होत्या. व गाडीतून उतरून काठी व सळ्या घेवुन अंगावर मारण्यासाठी धावत आले. त्यावेळी माझे सोबत असलेले इतर सहकारी यांनी मध्यस्थी करुन सोडवासोडव केली. अन्यथा त्यांनी मला ठार मारली असती. त्यानंतर गडबडीत काठ्या पंचायत समितीजवळ गटविकास अधिकारी यांचे केबीनजवळ टाकुन पळुन निघुन गेले अशा स्वरूपाची तक्रार शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी केली आहे
या सगळ्या प्रकरणी आता माजी आमदार संजय कदम यांच्यासह 20 ते 25 जणांना विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here