खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची सन 2022-23 या आर्थिक वर्षात व अवघ्या 52 महिन्यात 25,01,514/- निव्वळ नफा व 97.07% वसुलीसह दमदार आर्थिक स्थिती


——————————————.
एक पाऊल आर्थिक सक्षमतेेकडे …!
एक पाऊल आर्थिक सक्षमतेेकडे …! हे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने सिध्द करत व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींचा पतसंस्थेच्या कार्यभारावरही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होत असताना सुद्धा ,अशा परिस्थितीत सहकार क्षेत्रातील जुजबी माहिती असताना 20/11/2018 साली जिल्हा स्तरावर स्थापन झालेल्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांची विश्वासाहर्ता वाढवून ग्राहकांचा आर्थिक विकास साधत प्रगतीपथावर असणारी संस्था म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आली.
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने 31मार्च 2023 अखेर केवळ 52 महिन्याच्या कार्यकाळात 25 लाख 01 हजाराचा नफा प्राप्त करत जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली.त्यामुळे खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची ही वाटचाल खऱ्या अर्थाने विश्वासहार्य होताना दिसत आहे.
क्षतीग्रस्त व्यवसाय जगत व ठप्प जनजीवन काळ:
गत 52 महिन्याच्या कालावधी मध्ये जवळ-जवळ २० महिन्याचा कालावधी कोव्हीड-१९या महामारीने ने ग्रासलेला होता. दिर्घकालीन लॉकडाऊनमुळे क्षतीग्रस्त व्यवसाय जगत, ठप्प झालेले जनजीवन या सर्वांमध्येही ग्राहकांना नियोजनबद्ध ,नम्र व जलद सेवा देत शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणांचा त्यांचे अंमलबजावणीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न केल्यामुळे सर्वच आदर्श प्रमाणांच्या बाबतीत संस्थेने यशस्वीपणे काम केलेले आहे.अल्पावधीतच संस्थेचा आर्थिक सक्षमतेचा पाया भक्कम झालेला आहे.
सन2022-23 ची दमदार आर्थिक स्थिती:
संस्थेची 31 मार्च 2023 अखेर सभासद संख्या 4335 एवढी झाली
•ठेवी:- 09 कोटी 04 लाख
•कर्जे:- 07 कोटी 41 लाख
•गुंतवणूक:-02 कोटी 90 लाख
•खेळते भांडवल:- 11कोटी 07 लाख
•स्वनिधी:- 01 कोटी 45 लाख
•सी. डी.रेशो:-68.96 %
•वसुली:- 97.07%
•सोनेतारण कर्ज वसुली:- 100 %
लक्षणीय सीआरएआर
पतसंस्थांना नव्याने सीआरएआर (भांडवलाचे मालमत्तेशी पर्याप्तता प्रमाण) ही नवी संकल्पना या वर्षीपासून लागू केली गेली. ९ % सीआरएआर राखणे पतसंस्थांसाठी आवश्यक झाले.खारवी समाज विकास नागरी पतसंस्थेचा सीआरएआर हा 18.80% इतका लक्षणीय ठेवण्यात संस्था यशस्वी झाली आहे. थोडक्यात देणी भागवण्यासाठी संस्थेकडे पर्याप्त भांडवल क्षमता आहे. याचा अर्थ संस्था आर्थिक दृष्ट्या बलवान आहे. हे 18.80% भांडवल पर्याप्तता रेशो दर्शवते.
या आर्थिक वर्धिष्णू वाटचालीमुळे राज्यातील काही निवडक पतसंस्थामध्ये खारवी समाज पतसंस्थेचा समावेश होत आहे.
जिल्हा स्थरावरचे कार्यक्षेत्र असतानाही प्रधान कार्यालय व शृंगारतळी शाखेचे १२ महिन्याचे कामकाज व नव्याने सुरू झालेल्या दाभोळ शाखेचे ६९ दिवसांच्या कामकाजा मुळेच ही आर्थिक स्थिती निर्माण होऊ शकली.
आर्थिक स्पर्धेच्या युगातील आव्हान:
आर्थिक स्पर्धेच्या या युगात अर्थकारणाची गती राखण्याचं आव्हान आमच्या खारवी सामाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने पेलले. आर्थिक शिस्त,विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत “खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने” आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णू केला आहे.
संस्थेची विशेष उल्लेखनीय बलस्थाने:
•स्थापने पासूनच संस्थेचा संपूर्ण व्यवहार संगणिकृत असणारी पतसंस्था,
•सर्व शाखा सीसीटीव्ही च्या निगराणी खाली आहेत.
•सलग ४ वर्षे ‘अ’वर्ग प्राप्त
•प्रतिवर्षी खणखणीत नफा.
•पहिल्या वर्षापासूनच सभासदांना शेअर्स च्या रकमेवर लाभांश वाटप.
•मार्केटिंग साठी प्रति वर्षी सर्व सभासदां प्रत्यक्ष रूपाने पोहचण्यासाठी सर्व संचालकांसमवेत’ पतसंस्था
आपल्या दारी’ हा सलग 5 दिवसांचा प्रवास दौरा करणारी संस्था.
•सभासदांचे मनोबल उंचावून सभासदांमध्ये खऱ्या अर्थाने सहकार रुजवणारी पतसंस्था.
•सभासदांना RTGS. NEFT, IMPS ,QR CODE ,SMS BANKING या आधुनिक सुविधा पुरविण्यायासाठी
आधुनिक तंत्रज्ञानाचा जलदगतीने स्वीकार करणारी पतसंस्था.
•अत्यल्प थकबाकी, विक्रमी वसुली ही परंपरा कायम ठेवण्यात संस्था याही वर्षी यशस्वी झाली आहे.
पतसंस्थेच्या शिरपेचात दिपस्तंभ,बेस्ट महिला डायरेक्टर व बेस्ट महिला क्लार्क पुरस्कार
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. चा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार २०२ गट क्र १ मध्ये १ ते १० कोटी ठेवी असणा-या गटांमध्ये कोकण विभागांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सर्वांच्या एकजूटीने, परिश्रमाने व कामातील सातत्याने अल्पावधीतच दिपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला याचा सार्थ अभिमान आम्हाला नक्कीच आहे.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात पतसंस्थेच्या सौ.दीप्ती देवेंद्र कोळथरकर यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या ‘बेस्ट डायरेक्टर’ व कु.प्रथमा मिरजुळकर यांना ‘बेस्ट क्लार्क’ सक्षम सहकार,सक्षम महिला या पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.
अल्पावधीतच शाखा विस्तार
अल्पावधीतच शाखाविस्तारांचा प्रस्ताव सादर करून शृंगारतळी, दाभोळ , खंडाळा,पालशेत, पुर्णगड अशा पाच शाखा मंजूर झालेली पतसंस्था. पैकी शृंगारतळी व दाभोळ या शाखांचा प्रारंभ ही झाला आहे. दोन्ही शाखा घसघशीत नफ्यात आहेत.चालू आर्थिक वर्षात खंडाळा,पालशेत व पुर्णगड या शाखांचाही प्रारंभ होईल.
क्रियाशील संचालक मंडळ व समन्वय समिती सदस्य
संस्थेच्या अर्थचक्राला उत्तम सेवा देऊन गतिमान करणारे १३जणांचे सन्मा.संचालक, मंडळ १३ जणांचे जिल्हा समनव्य समिती मंडळ व नवनियुक्त १ तज्ञ संचालक यांच्या अथक सहकार्याची जोड संस्थेच्या आर्थिक उन्नती करीता प्राप्त झालीं आहे.संचालक व समन्वय समिती सदस्य यांनी आपले स्वतः चे कार्यक्षेत्र निश्चित केलेले असून आपल्या कार्यक्षेत्रात सतत सभासद व हितचिंतक यांच्या पर्यंत संवाद साधण्याचे काम करत असतात.
उच्च विद्याविभूषित व प्रशिक्षित कर्मचारी वृंद
३ शाखे मध्ये ९ जणांचा कर्मचारी वर्ग आज कार्यरत आहे.बी.कॉम, एम.कॉम व जी.डी.सी.अँड ए.पर्यंत उच्च शिक्षण प्राप्त केलेले कर्मचारी संस्थेला लाभलेले आहेत.सहकारातील आवश्यक ते प्रशिक्षण घेत पतसंस्थेच्या सर्वांगीण उन्नतीकरिता सामाजिक भावनेतून खऱ्या अर्थाने सक्षम सहकार रुजविण्यात कार्यक्षम होत आहे.
सामाजिक बांधिलकी
संस्था आपल्या आर्थिक सक्षमते बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत तसेच सभासदांच्या हिताला प्राधान्य देत असतानाच ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करत आहे.सभासदांच्या व्यक्तिगत व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना वेळोवेळी सन्मानित करत असते.
त्याच बरोबर रक्तदान शिबिरे व आरोग्य तपासणी शिबिरांचे या सारख्या अन्य समाजाला उपयुक्त कार्यक्रम/उपक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य पतसंस्था करत आहे.
संस्थेचे गतिमान झालेले मार्गक्रमण संपूर्ण जिल्ह्याला
गवसणी घालते झाले. आपल्या अर्थकारणात व्यावसायिकता आणि सहकारतत्त्व यांची सांगड घालून विस्तारत आहे. सहकारातील सामुहिक ताकद निर्माण करताना नवतंत्रज्ञान, व्यवसाय,संधी याचा कायद्याच्या परिघात राहत अचूक लाभ उठवत ग्राहकांनाही या लाभात सहभागी करून घेणरी पतसंस्था.
ग्राहकांचा विश्वास जपत , पतसंस्था अधिक उत्तम अर्थकारण नवनवीन योजना राबवून पार पाडेल असा विश्वास व्यक्त करताना सर्व ठेवीदार, कर्जदार, पिग्मीदार, सभासद, कर्मचारी, अधिकारी, पिग्मी प्रतिनिधी, संचालक, सहकारी, ऑडिटर, वकील, सहकार खात्याचे सर्व अधिकारी यांचा मोलाचा वाटा असून संस्था या सर्वांचीच ऋणी आहे. सर्वांनी दिलेल्या अनमोल सहकार्यामुळे खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे अर्थचक्र गतिमान राहिले. त्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी व उपाध्यक्ष सुधीर वासावे यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button