तारांगणाच्या प्रवेशद्वारावर वा अन्य ठिकाणी नगर परिषदेचा नावाचा उल्लेख नाही, नगर परिषदेला डावल्याचा माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांचा आरोप
रत्नागिरी नगरपरिषदेने माळनाका येथे उभारलेल्या हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या प्रवेशद्वारावर रत्नागिरी नगरपरिषदेचा कुठेही उल्लेख नाही तसेच तारांगणाच्या जाहिराती करणारे फलक रत्नागिरी शहरात लावण्यात आले आहेत. फलकांवरही रत्नागिरी नगरपरिषदेचा उल्लेख नाही. जाणूनबुजून रत्नागिरी नगरपरिषदेता उल्लेख टाळण्यात आला आहे का, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांनी केला असून रत्नागिरी नगरपरिषदेने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी मयेकर यांनी केली आहे.
डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाजावाजा करून तारांगणचे उद्घाटन करण्यात आले तसेच शहरामध्ये तारांगणाच्या जाहिरातीचे फलक लावण्यात आले, मात्र तारांगणाचे प्रवेशद्वार आणि जाहिरातीच्या फलकांवर रत्नागिरी नगरपरिषदेच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. आज तारांगणमध्ये रत्नागिरी नगरपरिषदेचे कर्मचारी काम करत आहेत. मात्र अद्यापही मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही गोष्ट का आली नाही, असा सवाल माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांनी केला. रत्नागिरी नगरपरिषदेने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सुदेश मयेकर यांनी केली आहे.
Www.konkantoday.com