कोकण रेल्वेकडून तीन होळी स्पेशल रेल्वे गाड्यामगोत्सवासाठी सुविधाः लोकमान्य टर्मिनससह पुणे, पनवेल येथून सुटणार गाडी

शिमगोत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी कोकणात मोठ्या प्रमाणात दाखल होतात.त्यांच्यासाठी कोकण रेल्वेकडून तीन होळी स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी या गाड्यांची घोषणा करण्यात आली.
कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून २६ फेब्रुवारी, ५ मार्च तसेच १२ मार्च या दिवशी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी मडगावला सकाळी १०.३० वा. पोहोचेल. ही गाडी परतीच्या प्रवासात मडगाव येथून २७ फेब्रुवारी, ६ मार्च, १३ मार्चला मडगाव येथून सकाळी साडेअकरा वाजता सुटून रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम तसेच करमाळी स्थानकावर थांबणार आहे. ही गाडी १७ डब्यांची धावणार आहे.
दुसरी विशेष गाडी पुणे जंक्शन ते करमाळीदरम्यान धावणार आहे. ही गाडी पुणे येथून २४ फेब्रुवारी, ३ मार्च, १० मार्च व १७ मार्चला सायं. साडेपाच वा. सुटून गोव्यात करमाळीला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही साप्ताहिक गाडी करमाळी येथून २६ फेब्रुवारी, ५ आणि १९ मार्च ला सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटून रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी,आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थिविम स्थानकांवर थांबणार आहे. एकूण २२ डब्यांची गाडी असेल.
तिसरी होळी विशेष गाडी करमाळी ते पनवेल मार्गावर धावणार आहे. ही गाडी २५ फेब्रुवारी, ४, ११ तसेच १८ मार्चला करमाळी येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ती सव्वा आठ वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २५ फेब्रुवारी, ४, ११ तसेच १८ मार्चला पनवेल येथून रात्री १० वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचेल. ही गाडी थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा या स्थानकांवर थांबे घेणार आहे.
Www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button