रत्नागिरी जिल्ह्यातील साडेचारशे जण घरकुलाच्या प्रतीक्षेत
रत्नागिरी : प्रधानमंत्री आवास योजना जिल्ह्यातील अनेक भागात रखडलेल्या स्थितीत आहे. या योजनेत सुमारे साडेचारशेे लाभार्थी असून योजनेच्या जाचक अटीमुळे प्रस्तावित लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न गेली पाच वर्षे अपूर्णच राहिले आहे.या योजनेत लाभार्थींची निवड केलेल्या अर्जाची पडताळणी करून केली जाते. मात्र , मध्यंतरी आलेल्या कोरोनाच्या साथीतही योजना तीनवर्षे मागे गेली आहे. यामध्ये अर्जाची छाननी करण्यापूर्वीच कोरोना या साथीच्या आजारामुळे व निधी न मिळाल्याने ही घरकुल योजना बारगळी. लाभार्थींना घरकुल बांधकाम करण्यापूर्वी काही शर्ती, अटी लावण्यात आल्याने ही योजना रखडल्याचे सांगण्यात येत आहे.