दापोलीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला दिंडीने प्रारंभ

दापोली : 50 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन  ए.जी.हायस्कूल दापोली येथे  दि. 23 रोजीपासून सुरू झाले आहे. त्याची सुरुवात सकाळी 9 वाजता निघालेल्या दिंडीने झाली.
विज्ञान जागर करीत निघालेल्या दिंडीमध्ये गटविकास अधिकारी, आर.एम.दिघे, गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांच्यासह शिक्षण विभागातील सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, दापोली शिक्षण संस्थेचे सचिव सौरभ बोडस, स्कूलकमेटी अध्यक्ष रवींद्र कालेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, मुख्याध्यापक सतीश जोशी, शाळेतील विज्ञान वारकरी विद्यार्थी, शिक्षक, तालुक्यातील अनेक शिक्षक यांनी सहभाग घेत, लेझीम, ग्रंथ पालखी नाचवत दापोली शहरातून दिंडी काढली.
यानंतर श्रीराम माजलेकर यांचे अध्यक्षतेखाली आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत,  बी.डी.ओ.आर.एम.दिघे, अण्णासाहेब बळवंतराव, संस्थेचे पदाधिकारी डॉ. करमरकर, सौरभ बोडस यांच्या उपस्थितीत विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. सौरभ बोडस यांनी पाच मिनिटात पाच भारतीय विज्ञानातील रहस्य उलगडले. तर इतिहास, परंपरा ही अशी गोष्ट आहे की ती विकत घेता येत नाही, असे महाजन यांनी संस्थेची ओळख करून देताना सांगितले. निवडक प्रतिकृतीची मांडणी केलेल्या सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देत माध्यमिक विस्तार अधिकारी गोपाळ चोधरी यांनी प्रास्ताविक केले. शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत म्हणाल्या, विज्ञान हे वरदान आहे, तसा गैरवापर केल्यास शापही आहे. मोबाईलचा वापर मर्यादित करावा. विज्ञानाचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठीच होईल, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे सावंत यांनी सांगितले.
श्रीराम माजलेकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन टाळसुरे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश राऊत यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button