संगमेश्वर तालुक्यातील चार खेळाडू राज्यात करणार जिल्ह्याचे नेतृत्व

0
77

देवरूख : नगर पंचायत तायक्वांदो क्लबचे राज रसाळ, साहिल घडशी, धनंजय जाधव, राहुल चव्हाण या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली असून ते रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तायक्वांदो  फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 32 वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर  तायक्वांदो अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव या ठिकाणी  होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडू सहभागी होणार आहेत. शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल, साडवली या येथे अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, जि. प. माजी अध्यक्ष रोहन बने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी देवरूख क्लबच्या स्मिता लाड, अ‍ॅड. पूनम चव्हाण, संदेश जागुष्टे, प्रशिक्षक शशांक घडशी व स्वप्नील दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. निवड झालेल्या खेळाडूंचे चिपळूणचे आमदार शेखर निकम,  नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव पवार आदींनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here