रत्नागिरी जिल्ह्यातील तिसर्या टप्प्यात 299 शिक्षकांच्या बदल्या
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या सध्या टप्प्याटप्प्याने सुरु आहेत. तिसर्या टप्प्यात 299 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या सर्व शिक्षकांना सुगम क्षेत्रातील शाळा मिळाल्या आहेत. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तिसर्या टप्प्यात बदली अधिकार पात्र ठरलेल्या 1 हजार 473 शिक्षकांना बदलीसाठी शाळा विकल्प ऑनलाईन भरण्यासाठी मुदत दिली गेली होती. त्यापैकी 399 शिक्षकांनी बदलीसाठी विकल्प भरले. अपेक्षित शाळा नसल्यामुळे बहूसंख्य शिक्षकांनी बदली प्रक्रियेतून माघार घेतल्याची चर्चा सुरु आहे. अवघड क्षेत्रातील अनेक शिक्षक सुगम शाळांमध्ये येण्यास उत्सुक असतानाही प्रत्यक्ष बदली प्रक्रियेत आलेल्या शिक्षकांचा टक्का कमी आहे. विकल्प भरलेल्यांपैकी 299 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. शंभर शिक्षकांनी शाळा विकल्पच समान भरल्यामुळे त्यांना संधी मिळालेली नाही, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. बदली करताना सेवा ज्येष्ठता पहिली जाते आणि बदलीसाठी प्राधान्य दिले जाते. शंभर शिक्षक बदली प्रक्रियेतून बाहेर गेले असून पुढील टप्प्यात त्यांना संधी मिळणार नाही