तळवडे येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
राजापूर : अर्जुना नदीच्या काठावर वसलेल्या आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या राजापूर तालुक्यातील निर्सगरम्य अशा तळवडे गावात राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे 8 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. ही माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी दिली. हे संमेलन दि. 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत तळवडे येथील प्रभावती हॉलमध्ये होणार आहे. राजापूर-लांजा नागरिक संघ व तळवडे ग्राम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे, या मातीतून चांगले कलाकार, लेखक, साहित्यिक, कवी, पत्रकार, उद्योजक निर्माण व्हावेत, या उद्देशाने प्रत्येकवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या साहित्य संमेलनासाठी तळवडे गावाची निवड करण्यात आली आहे.