रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी : डोंबिवलीच्या पवन केणीने केल्या 14 चेंडूत 53 धावा
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे चालू असलेल्या ओम साई स्पोर्टस् आयोजित व ना. उदय सामंत पुरस्कृत डे – नाईट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 लीग स्पर्धेच्या तिसरा दिवशी शिवांश स्पोर्ट्स राजापूर व एसएससीसी डोंबवली हे दोन संघ उपउपांत्य फेरीमध्ये दाखल झाले.
डोंबिवली संघाच्या पवन केणीने विस्फोटक खेळी करत 14 चेंडूत 53 धावा केल्या. लीग स्पर्धेचा तिसरा दिवस शिवांश स्पोर्ट्स राजापूर संघांने गाजवला. या गटात चार संघ साखळी फेरीत खेळले. प्रत्येक संघाला तीन सामने खेळायला मिळाले. त्यात शिवांश स्पोर्ट्स संघाने तिन्ही सामने जिंकून या गटातील आपली दावेदारी भक्कम केली. या संघातील सूरज पाष्टे, अक्षय घरत, राहुल पाटील यांनी सुरेख गोलंदाजी केली. अक्षय घरत याने दोन षटकात पाच बळी मिळवत सामनावीर पारितोषिक पटकावले. गटातील दुसरा संघ एसएससीसी डोंबवली संघाने दोन सामने जिंकून दुसरा क्रमांक पटकावला. या संघातील पवन केणीने स्पर्धेतील पाहिले अर्धशतक झळकावले. पवन केणी यांनी 14 चेंडू 53 धावा केल्या. यात त्याने 7 षटकार व 2 चौकार लगावले.