दारूच्या नशेत दुचाकी चालवून अपघात करणार्याला दंड
रत्नागिरी : दारूच्या नशेत निष्काळजीपणे दुचाकी चालवून दोन कारच्या अपघातास कारणीभूत झालेल्याला न्यायालयाने बुधवारी 3 हजार 500 रुपयांचा दंड केला. शिवाजीनगर येथे ही घटना 29 डिसेंबर 2022 सकाळी 9.45 सुमारास घडली होती. दीपक आनंद जाधव (44, रा. मांडवी, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी मद्य सेवन करुन दुचाकी (एमएच-08 एजी 2183) घेऊन साळवी स्टॉप ते माळनाका असा जात होता. शिवाजीनगर बस स्टॉप येथे आला असताना पुढे जाणार्या मोटार ( एमएच-08 आर 0185) ला पाठीमागून ठोकर दिली. त्यामुळे ती मोटार रस्त्याच्या पलिकडे थांबलेल्या मोटार ( एमएच-08 एजी 0360) वर आदळून अपघात झाला.